तरूण असणं ही फक्त वयाशी संबंधित गोष्ट आहे, असं अजिबात नाही.. तारूण्य ही वयावर नाही तर मनावर अवलंबून असलेली गोष्ट आहे. शारीरिक वय कितीही झालं तरी मनानं नेहमीच तरूण असणारी काही माणसं या भूतलावर अवतरली त्यातला एक म्हणजे सचिन तेंडुलकर... तिरंगी एकदिवसीय मालिकेतल्या श्रीलंकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात सचिननं आपलं ४४ वं शतक पूर्ण केलं. त्यानिमित्ताने साम मराठीच्या आमच्या बातम्यांसाठी एक पॅकेज लिहीले होते ते मला येथे पोस्ट म्हणून टाकावेसे वाटले..
त्याचं शारीरिक वय आहे ३६ वर्ष १४४ दिवस. त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळला १८ डिसेंबर १९८९ या दिवशी म्हणजे बरोबर ४ दिवसांनी त्याच्या कारकिर्दीला २० वर्ष पूर्ण होतील.. तब्बल ४२७ एकदिवसीय सामने त्याने खेळले आहेत. तरिही धावांची भूक कायम आहे... नव्हे आता दुप्पट वाढलीय. आजही सर्वोत्तम सलामीवीर तोच आहे हे त्यानं दाखवून दिलंय. सलामीला आल्यावर ६ धावांची धावगती तो सहज राखू शकतो.. आणि आपलं शतक पूर्ण करताना आजही तो अवघे ९३ चेंडू घेऊ शकतो. शतक पूर्ण करताना त्याने अवघे ८ चौकार मारले.. याचा अर्थ त्याने ६८ धावा या पळून काढल्या .. श्रीलंकेतल्या सध्याच्या उकाड्यात या ६८ धावा पळून काढणं किती कठीण आहे हे सांगायला नकोच. आणि एवढ्या धावा पळून काढूनही तो अवघ्या ९३ चेंडूत शतक झळकावू शकतो.. शतक झाल्यावरही तो आडवीतीडवी बॅट फिरवून विकेट पणाला लावत धावांच्या मागे लागत नाही. टिकून राहत धावांचा वेग मंदावणार नाही याची काळजी मात्र नक्की घेतो.. धावा काढतानाचा त्याचा उत्साह आजही तरूण क्रिकेटपटूंना लाजवतो.. त्याचं चौकार मारतानाचं पदलालित्य आजही प्रत्येक विद्यार्थ्यानं पाहावं असं.. त्याची फलंदाजी हा धावांचा ओघवता धबधबा आहेच, पण तो एक संदर्भ ग्रंथही आहे. क्रिकेट शिकणाऱ्या प्रत्येकानं क्रिकेट कसं खेळायचं यापेक्षा क्रिकेट का खेळायचं याचा परिपाठ देणारी त्याची फलंदाजी... मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात तो आजही त्याचे सहजसुंदर फटके मारतो. ड्राईव्हज्, कट्स, पुल, हुक यांचा सुंदर मिलाफ तो घडवतो. ऑफसाईडला त्याला सापळ्यात पकडण्यासाठी पाच पाच क्षेत्ररक्षकांचं कडं उभारलं तरीही तो ते लिलया भेदून दाखवतो... सापळ्याच्या विरूद्ध दिशेला खेळून समोरच्या कर्णधारालाच सापळ्यात पकडण्याचं त्याचं चातुर्य तर लाजवाब. आपल्या खेळीनं संघाच्या धावा वाढवायच्या, संघाची जबाबदारी वाहायची, आपल्या चाहत्यांना खूष करायचंच त्याचबरोबर आपल्य़ा टीकाकारांनाही शांत ठेवायचं.. एवढी सगळी व्यवधानं गेली २० वर्षं अव्याहतपणे वाहणारा सचिन खरोखर एकमेवाद्वितीय...
( हा ब्लॉग प्रदर्शित करण्यासाठी साम मराठी वृत्तविभागाची मदत झाली. त्याबद्दल त्यांचे आभार)
आधी मला हे सांग, ३६ वर्षांचा खेळाडू म्हातारा असतो, हे तुला कोणी सांगितलं? :) तो २० वर्षांपासून खेळतोय म्हणून म्हातारा नाहीच मुळी. सचिन इज ग्रेट.....
ReplyDeleteनिमा... काल आमचा करार झालाय. म्हणजे माझा आणि अमितचा... मुंबई इंडियन्सच्या टीममधून आयपीएल खेळणा-यांना मी 'मुंबईचा प्लेअर' म्हणणार नाहीये आणि अमित सचिनला 'म्हातारा' म्हणणार नाहिये... (अमित... गांगूली आणि द्रविडला म्हातारा म्हणायला माझी आजिबात हरकत नाही...!) बाय द वे... सचिन इज ग्रेट. त्याच्याबद्दल लिहायचं म्हणजे अवघडच... ते तू मस्त केलंय. तुझं पॅकेज ऐकताना जेवढी मजा आली होती तितकीच ते वाचतानाही आली... मस्त!
ReplyDeletelekh kup chan aahe
ReplyDeletepun sachin kahe mhatara nahi aahe...
karan ajunahe to tikach changla
ani record break khel khelto...