Friday, August 21, 2009

जाणीव...

जाणीव... ब्लॉग लिहावा.. ब्लॉगिंग करावं असं मला वाटलं तेव्हा तातडीने ब्लॉग पेज तयार केलं, मात्र घोडं नावावर अडलं होतं. नाव काय द्यावं. विचार केला खुप आणि हे नाव सुचलं. जाणीव... जाणीव आहे म्हणून आपण जिवंत आहोत. संवेदना, असंही मनात आलं होतं. मात्र जाणीव त्याच्यापेक्षाही जास्त जवळचं वाटलं.. जगात पाऊल ठेवल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत असते ती जाणीव.. जाणीव संपली की सगळं संपलं.. जिवंतपणाचं लक्षण.
जन्माला आल्याआल्या विश्वात आल्याची जाणीव.. आईसोबत आहे याची जाणीव.. भुकेची जाणीव, झोपेची जाणीव, स्पर्शाची जाणीव, इथपासून या क्षणापर्यंत प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत असते ती आपली जाणीव.. हीच जाणीव सोबत आहे आणि प्रत्येक क्षणाला राहील हे लक्षात घेऊन या ब्लॉगला नाव दिलं जाणीव.. असो ब्लॉगचा नामकरण विधी तर झालाय, आता पाहूया लिहायला काय काय सुचतंय. तुर्तास तरी इथेच थांबावं हे उत्तम....

7 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. श्रीकृष्ण....
    मित्रा ब्लॉगविश्वात तुझे हार्दीक स्वागत, तुझ्याकडूनही आमच्यासारखेच वेगळे विषय वाचायला मिळतील याबद्दल शुभेच्छा, बेस्ट आँफ लक
    श्रीकृष्ण कुलकर्णी

    ReplyDelete
  3. अमित, चला आणखी एक जोडीदार भेटला, आपण बोलताना जे राहून जातं ते लिहिताना हाती येतं हा नेहमीचा अनुभव आहे. ब्लॉग सुरु केल्याबद्दल अभिनंदन

    ReplyDelete
  4. स्वागत... जाणीवेचं स्वागत... जाणीव हे जीवंतपणाचं लक्षण... अतिशय खरं आहे. हा ब्लॉगही असाच जाणीव-नेणीवेसह जीवंत रहावा, ही सदिच्छा...

    ReplyDelete
  5. Congratulation

    &

    all the best.......

    Prasad Tendulkar

    ReplyDelete
  6. वेदना-संवदना आणि जाणीवा-नेणीवा मानवी मनाचे हे अविभाज्य घटक आहेत. किंबहुना माणसाच्या जाणीवेवरून त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा उलगडा होण्यास मदत होते. तुझ्या लिखाणातून तुझ्या जाणीवा आणि पर्यायाने तुझे व्यक्तीमत्त्व उलगडेल, तसेच या प्रक्रियेत तुझाही विकास होईल, अशी आशा आहे. लिखाण करावे वाटण्याची जाणीव झाल्याबाबत तुझे अभिनंदन आणि आपल्याला सतत लिहायचे आहे याची जाणीव तुझ्यात कायम राहो ही सदिच्छा !!!
    - मनोज गडनीस

    ReplyDelete
  7. AMIT,CONGRATS AND BEST WISHES FOR EXPRESSING THRU THIS BLOG.I LIKED DURGA ARTICLE V.MUCH.IN FACT SUCH NEWS GIVES SOME HOPE TO CARRY LIFE ON.WHEN I MEET PERSONS LIKE U THRU THOUGHTS,I FORGET MY LONELINESS,FEEL LESS DEPRESSED ABOUT WHATEVER IS HAPPENING AROUND US THESE DAYS.CARRY ON....MADHUWANTI

    ReplyDelete