या मुंबई शहरात अनेक लोक अनेक कारणांनी येतात. प्रत्येकाची या मुंबापुरीकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा हे शहर पूर्ण करतंय. एक गोष्ट इथं स्पष्ट केली पाहीजे हे शहर याचा अर्थ इथला समाज.
मुंबईत कोणीही उपाशी रहात नाही, प्रत्येकाला काम मिळतंच. त्याची हातातोंडाची गाठ पडतेच असं अभिमानाने म्हटलं जातं. त्यामुळे या शहराला जॉब हब असंही म्हणतात. जॉब मिळाला की सगळंच मिळतं जातं.. मुंबई सर्वांची गरज पूर्ण करते. पण याच मुंबईची अजून एक ओळख आहे. अद्ययावत वैद्यकीय मदत देणारी ही नगरी.. मेडिकल हब असं म्हणा ना.. त्यातही कँसर, हार्ट अशा असाध्य आणि किचकट रोगांवर इलाज हे मुंबईचं वैशिष्ट्य. राज्यातून, देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेक रूग्ण उपचारांसाठी मुंबईत येतात. केईएम, टाटा, वाडीया, जसलोक, कूपर, कँसर रिसर्च सोसायटी अशी अनेक हॉस्पिटल्स इथे उभी आहेत. रूग्णांवर मोठ्या प्रमाणावर इलाज सुरू आहेत. या हॉस्पिटल्सचे खरोखर उपकार आहेत. पण तेवढचे उपकार आहेत इथल्या काही सामाजीक संस्थांचे..
अशाच एका संस्थेत काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. नाना पालकर रूग्ण सेवा समिती या संस्थेचं रूग्ण सेवा सदन परळला आहे. रूग्ण सेवा समितीद्वारे केलं जाणारं काम पाहीलं आणि थक्क व्हायला झालं. मुंबईत उपचारासाठी आल्यावर रूग्णांवर तर हॉस्पिटल्समध्ये उपचार केले जातात. पण या रूग्णांच्या नातेवाईकांचं काय. त्यांनी मुंबईत रहायचं कुठे. तर अशा रूग्णांसाठी आणि रूग्णांच्या नातेवाईकांसाठी रूग्ण सेवा सदन सारखी वास्तू उभी आहे. आज तब्बल दहा मजल्यांची ही वास्तू आहे. तब्बल ७६ रूग्ण, प्रत्येक रूग्णांचे दोन नातेवाईक अशा एकूण २२८ जणांच्या भोजन निवासाची सोय इथे होते. एका खोलीत दोन रूग्ण आणि त्यांचे दोन दोन सहकारी अशी व्यवस्था केली जाते. प्रत्येक खोलीत स्वच्छतागृह पंखे, सोलरद्वारे गरम पाणी, लॉकर अशी सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे अतिषय नाममात्र दरात ही सोय केली जाते. इथे नाममात्र म्हणजे अक्षरशः नाममात्र असं म्हटलं पाहीजे. कारण त्यापेक्षाही कमी दरात सोय करायची असं म्हटलं तर म्हणजे फुकट असंच म्हटलं पाहीजे.. आणि तशी अक्षरशः फुकट सोयही इथे अतिषय गरीब आणि गरजूंचीही केली जाते हे नमुद केलंच पाहीजे.
नाना पालकर हे संघाचे एक विचारवंत कार्यकर्ते. वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांचं देहावसन झालं. एवढ्या कमी आयु्ष्यात नानांनी सेवाकार्य हेच आपलं जीवनध्येय आहे असं मानून संघकार्यासाठी जीवन समर्पित केलं. उत्तम लेखक, कवी, कार्यकर्ता, प्रभावी वक्ता, ल अशी स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली. रूग्णसेवेविषयी त्यांना आत्यंतिक निष्ठा आणि आस्था होती. १९६७ मध्ये नाना पालकर यांचं देहावसन झालं. त्यानंतर त्यांच्या सहयोगींनी १९६८ साली नाना पालकर स्मृती समितीची स्थापना केली.
या संस्थेने चालवलेले उपक्रम हे खरोखर गरीबांसाठी उपकारक ठरले आहेत. १० मजली रूग्ण सेवा सदनाची आपण ओळख वर करून घेतली आहेच. याशिवाय नाना पालकर चिकित्सालय, डॉ. ग. कृ. पाटणकर क्षय रोग चिकित्सा केंद्र, गोखले डायलेलिस केंद्र, तुलसियानी स्पेशालिटी लॅबोरेटरी, मधू औषध पेढी, प्रभाकर कुटूंब कल्याण केंद्र, रूग्णमित्र हे वैद्यकीय मासिक असे अनेक मोठे उपक्रम राबवले जातात. याशिवाय रायगड जिल्ह्यात कुपोषित आजारी मुले व माता पोषक आहार, नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, धडगाव कुपोषण निर्मुलन, माटुंगा आणि औरंगाबाद इथे लिथोस्ट्रीप्सी केंद्र, टाटा हॉस्पिटलसमोरचं डॉ. शिवानंद लवेकर चिकित्सालय, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, मोघालय इथे सेवा भारती आरोग्यसेवा असे अनेक उपक्रम आणि सहउपक्रम नाना पालकर स्मृती समितीतर्फे राबवले जातात.
डायलेसिस सेंटर, लिथोस्ट्रीप्सी सेंटर, किंवा पॅथोलॉजिकल लॅब चालवणे यात नवल ते काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या प्रश्नाला उत्तर असं आहे की या सर्व ठिकाणी हे सर्व उपचार आणि तपासण्या अतिषय नाममात्र दरात आणि काही केसेसमध्ये फुकटसुद्धा दिल्या जातात. आज मुंबईत डायलेसिसचे दर काय आहेत याची माहिती करून घ्या.. या संस्थेमध्ये डायलेसिस अवघ्या ३५० रूपयात केले जातात. विशेष म्हणजे २००४ पासून हे दर एक रूपयानेही वाढलेले नाहीत. सदनात १२ मशिन्स कार्यरत आहेत. रोज तीन पाळ्यांमध्ये एकूण ३६ रूग्णांना या सेवेचा लाभ मिळतो. याशिवाय तुलसियानी स्पेश्यालिटी लॅबोरेटरीमध्ये एड्स एचआयव्ही संबंधीत सी.डी.३, सी.डी. ४ तपासण्या अवघ्या २५० रूपयात केल्या जातात. याशिवाय बाकीच्या सर्व तपासण्या अत्यंत नाममात्र दरात केल्या जातात. मधु औषध पेढीमार्फत आर्थिक असहाय्यतेमुळे वैद्यकीय उपचार पूर्ण करू न शकणाऱ्या रूग्णांना औषधोपचार, आहार, फळे, इंजेक्शन्स, ऑपरेशन्स, जेवण, कपडे यांसाठी लागणारी मदत दिली जाते.
याशिवाय या संस्थेतर्फे मुंबईच्या विविध रूग्णालयात बालरूग्णांच्या मातांना पोळी भाजी, बाल रूग्णांसाठी नाश्ता, फळवाटप केलं जातं. वाडिया, जेजे, नायर, सायन, पॅराप्लेजीक सोसायटी केईएम, रिसर्च सोसायटी, शिवडी, हाजी बच्चुअली रूग्णायल, क्षयरोग रूग्णालय या हॉस्पिटल्सना आर्थिक मदत दिली जाते. या हॉस्पिटल्समध्ये रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लागणारी आहार आणि औषध विषयक मदत दिली जाते.
या संस्थेचा मदतीचा आवाका पाहून थक्क व्हायला झालं. स्वतः नाना पालकरांसोबत काम केलेल्या ज्येष्ठांच्या हातात आज या संस्थेची धुरा आहे. श्री. छत्रे, श्री बोपर्डीकर, श्री. खरे, डॉ. अजित फडके यांच्या समर्थ हातात या संस्थेचं कार्य निस्पृहपणे सुरू आहे. यातल्या श्री. छत्रे आणि श्री. बोपर्डीकर यांच्याबरोबर ही संस्था पाहण्याचा योग आला. श्री. छत्रे स्वतः ८३ वर्षांचे आहेत. तर श्री. बोपर्डीकर ७५ वर्षांचे आहेत. पण या दोघांचा कामाचा आवाका, रूग्ण सेवेची कळकळ, आणि संस्थेवर असलेलं प्रेम पाहून 'तेथे कर माझे जुळती' अशी मनाची अवस्था होते.
काही व्यक्ती आणि संस्थांच्या चांगुलपणावर समाज टिकून आहे असं म्हणतात, त्यातली एक संस्था पहायचा योग आला एवढं नक्की..
Wednesday, March 16, 2011
Thursday, March 3, 2011
पोटासाठी वाटेल ते..
टीचभर खळगीसाठी माणसाला काय काय करावं लागतं याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मायानगरी मुंबईत नशिब काढायला आलेल्यांनी तर काय काय धंदे केलेत, काय काय पचवलंय याचे तर अगणित किस्से आहेत. त्यात आता आणखी एक किस्सा.. या फोटोतली ही मॉडेल आहे सोफिया हयात..
मुळची पाकिस्तानी मॉडेल. मुंबईत आपलं करियर घडवण्यासाठी ती आलीये. तशी ती ब्रिटीश नागरिक, पण जन्माने पाकिस्तानी. ही मॉ़डेल, टीव्ही एँकर, एँक्ट्रेस आता बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. बॉलिवूडचा तुफान पैसा तिला खुणावतोय. पण 'इये बॉलिवूडचीये नगरी' बस्तान बसवायचं म्हणजे फार कठीण काम आहे. अनेकजणी आल्या आणि गेल्या. या बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अनेकांच्या रांगा लागल्यात. त्यांना स्ट्ररगलर्स असं गोंडस नाव देण्यात आलं. त्या स्ट्रगलर्सच्या यादीत आता सोफियाचंही नाव सामील झालंय. तर सांगायचा मुद्दा असा की आता सोफियाचा हा फोटो पहा.. या फोटोत ती भारताला प्रमोट करत आहे.
भारताला प्रमोट का.. तर आता तिचा पहिलावहिला भारतीय सिनेमा म्हणजेच बॉलिवूड चित्रपट येतोय. त्याचं नाव आहे 'डायरी ऑफ ए बटरफ्लाय'.. हा चित्रपट फारसा कोणी ऐकलेला नाही. पण सोफियाची बॉलीवूडमध्ये जम बसवण्याची इच्छा आहे. त्यासाठी ही पाकिस्तानी मुलगी भारताची झेंडा गालावर कोरून, स्वतःच्या उघड्या पाठीवर किंवा कंबरेवर भारताला शुभेच्छा गोंदवून, भारताला चिअर करत्ये..वा.. पोटासाठी काय काय करावं लागतं.. एक पाकिस्तानी मुलगी अशा भारताला शुभेच्छा देत आहे. एकीकडे पाकिस्तान आपल्या कलाकारांना व्हीसा नामंजूर करतोय. राहत फतेह अली खानच्या प्रकरणानंतर पाकिस्ताननं भारतात जाणाऱ्या कलाकारांना नाहरकत प्रमाणपत्र घेण्याचं बंधन घातलंय.
पण एवढं सगळं झालं तरी सोफिया भारताला चिअर करत्ये. क्या बात है.. पोट काय काय करायला लावतं..

Monday, February 7, 2011
हम दोनो- रंगीन..
रविवार साजरा करायचा होता. तीन सिनेमे नजरेत होते. ये साली जिंदगी, दिल तो बच्चा है जी, किंवा भागमभाग.. यापैकी कोणत्या सिनेमावर पैसे फुकट घालवायचे याचा विचार सुरू होता. सकाळी सकाळी मोहम्मद रफींची सीडी लावली होती. माझ्याकडे रफिसाहेबांची जवळपास दोनशे अडीचशे गाणी आहेत. त्यापैकी 'अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही' हे तुफान आवडतं गाणं. ते गाणं ऐकताना नेहमी वाटायचं की मोठ्या स्क्रीनवर हे गाणं ऍकायला कसं वाटेल. त्याचवेळी आठवलं अरे आपण तीन दिवसापूर्वीच हम दोनोच्या रंगीत आवृत्तीची बातमी केलीय. लगेच निर्णय झाला.. वर उल्लेख केलेले तीनही चित्रपट बाद.. डोंबिवलीत पूजा टॉकीजला दुपारी साडेतीनचा हम दोनो रंगीन चा शो आहे.. तोच पहायचा.. बाबांना विचारलं पिक्चर चांगला आहे का.. बाबा म्हणाले त्यांनी कॉलेजमध्ये बंक करून तीन वेळा हा चित्रपट पाहीलाय. गाणी ऐकण्यासाठी आम्ही पिक्चर पहायचो.. क्या बात है ! अभी ना जाओ छोडकर, मै जिंदगी का साथ निभाता चला गया, अल्ला तेरो नाम.. अशी एकसे बढकर एक गाणी मोठ्या स्क्रीनवर ऐकण्याची इच्छा अनावर झाली.

आयत्यावेळी थिएटरवर पोचलो तरी तिकीटं मिळतील याची खात्री होती त्याप्रमाणे तिकीट मिळाली. पिक्चर पहायला अगदी थोडी माणसं आली होती. टिव्हीवर पन्नासवेळा लागलेला हा सिक्सटीजमधला सिनेमा पहायला कोणाला इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आलेले खरोखर दर्दी आले होते. माझे आई बाबा मी आणि बायको असे आम्ही एकच पूर्ण फॅमिलीवाले होतो. बाकी लोकांत बहुतेकांनी साठी ओलांडलेली होती. त्यातले सगळेजण देव आनंदला पुन्हा एकदा स्क्रीनवर पहायला आले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या चॉकलेट हिरोला पहाण्यासाठी लकाकी आली होती. एक आजी आजोबा हातात हात घालून आले होते. थिएटरमध्ये आत सोडल्यावर सिनेमा सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनीटात सर्व आजी आजोबात ओळखपाळख नसताना संवाद रंगला.. देव आनंद तेव्हा काय दिसायचा.. त्याच्याकडून अभिनयाची अपेक्षाच नव्हती.. तीन तास तू फक्त पडद्यावर दिस.. रफीसाहेबांचा आवाज.. देव आनंदला त्यांचाच आवाज कसा सूट व्हायचा..जयदेवने संगीत देताना काय कमाल केली.. असे अनेक विषय निघाले. प्रेक्षकांमध्ये तुफान उत्साह संचारला होता. आणि तेवढ्यात सुरू स्क्रीनवर सुरू झाला म्हाताऱ्या देव आनंदचा प्रेक्षकांशी साधलेला संवाद.. नमश्कार.. मै देव आनंद बोल रहा हू.. हम दोनो मेरी आखरी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म.. असं त्याने सांगायला सुरूवात केली. त्यानंतर मै जिंदगी का साथ निभाता चला गयाची लायटरची सुंदर धून सुरू झाली. आणि मग ते अलगत फेड आऊट होत स्क्रीनवर आलं सेन्सॉर सर्टीफिकेट.. त्यावर मुद्दाम लिहीलं होतं.. हम दोनो रंगीन... सिनेमास्कोप.. क्या बात है..
मी ही चित्रपट याआधी पाहिला नव्हता.. त्यामुळे मला सगळाच नवा होता.. पण तळ्याकाठी बसलेल्या रंगीत देवआनंदला पाहिल्यावर थिएटरमध्ये एक अलगद चित्कार ऐकायला आला.. पहिल्या जवळपास दोन अडीच सीनमध्ये एकही डॉयलॉग नाही.. फक्त देव आनंद, साधना आणि लायटरची धून.. त्यानंतर माझं तुफान आवडतं गाणं सुरू झालं. अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही.. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज मोठ्या स्क्रीनवर मी प्रथमच ऐकला होता. त्याआधी टायटल प्ले होताना सुद्धा.. स्क्रीनवर सिंगरच्या खाली मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले ही तीन नावं मी माझ्या आयुष्यात प्रथमच वाचली.. घरात बसून या सगळ्यांच्या सीडी ऐकणं आणि प्रत्यक्ष त्यांची नावं स्क्रीनवर पहाणं यात मोठा फरक आहे. तो अनुभव मला घ्यायचा होता. तो मिळाला.. अभी ना जाओ छोडकर ऐकताना खुप सुंदर वाटतं. थिएटरच्या साऊंड सिस्टीमवर हे गाणं फक्त रफीसाहेबांचा आवाज, अत्यंत सुंदर वाजणारा धा तीं तीं ताक धीं धीं वाजणारा तबला आणि हार्मोनियम, आणि इतर थोडकी वाद्य.. आणि संतूरची कमाल.. हा एक तुफान अनुभव होता. वाद्यांच्या आवाजात हरवून जाण्याच्या या काळात रफीसाहेबांचा गोड गंभीर आवाज ऐकण्यासाठी थिएटरचीच सिस्टीम हवी..

मला एक न उलगडलेलं कोडं आहे.. रफीसाहेबांनी देव आनंदला आवाज दिला, दिलीप कुमार, शम्मी कपूर आणि राज कपूर वगळता इतरांनाही दिला. पण प्रत्येक वेळी गाणं ऐकताना त्यांनी त्या त्या हिरोला सूट करेल अशाच आवाजात गाणं गायलय. हे कसं ते कळत नाही. देव आनंदला दिलेल्या आवाजाची ढब आणि शम्मी कपूरला दिलेल्या आवाजाची ढब वेगळी कशी.. ही काय जादू हा देवमाणूस करतो.. हैराण करणाऱ्या गोष्टी आहेत या.. हर फिक्र को धुए मै उडाता चला गया म्हणणाला कॅप्टन आनंद अप्रतिम..
पिक्चर संपला. बाहेर आलो.. तेव्हा काही बोलायचं नव्हतं. सिक्सटीजमध्ये लोकांना देव आनंदने का वेड लावलं. तू फक्त पडद्यावर तीन तास दीस.. अभिनयाची अपेक्षा नाही.. मोहम्मद रफी हे काय रसायन आहे. फक्त गाणी ऐकण्यासाठी आम्ही तीन वेळा हा चित्रपट पाहिला असं बाबा का म्हणाले. याचं रहस्य उलडगडलं. यही कहो गे तुम सदा के दिल अभी नही भरा.. असं खट्याळपणे म्हणणारी आशा भोसले की साधना.. एक जादू मनावर घेऊन बाहेर आलो.. अजून त्यातून बाहेर येता येत नाहीये..

Sunday, September 5, 2010
नभः स्पर्शं दीप्तम्

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजवर अनेक जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या. या घेतलेल्या जबाबदाऱ्या त्याने लिलया पेलल्याही. सचिनच्या या खांद्याने आजवर भारतीय क्रिकेट संघाला कितीवेळा तारलं याचं मोजमाप केलं तर धाप लागेल. सचिनच्या या खांद्यांनी भारताची कित्येकवेळा लाज राखली. सचिनने अनेक जबाबदाऱ्या घेत भारताची मान उंचावलीही.
तब्बल २० वर्ष भारताचा युनिफॉर्म अंगावर चढवून सचिन लढला. त्याने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. अगदी क्रिकेटच्या विश्वासार्हतेवरचं जेव्हा शंका घेतल्या जाऊ लागल्या तेव्हाही सचिन डळमळला नाही. एका सैनिकासारखा लढला. त्याच्या याच गुणांचा, कार्याचा गौरव करण्यासाठी भारताच्या वायुदलाने त्याला मानद ग्रुप कॅप्टन हे पद बहाल केलंय. सचिन या वीराचा गौरव करण्यासाठी वायुदलाने हा निर्णय घेतला आणि प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला.
एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक जेव्हा सचिनच्या खांद्यावर त्याच्या रँक लावत होते त्यावेळी सचिनच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. एक वेगळेच समाधान या क्रिकेट योग्याच्या चेहऱ्यावर होतं. अनेक शतकं, अनेक विक्रम त्याने सहज मोडले. तरिही असे भाव कधीही त्याच्या चेहऱ्यावर उमटले नव्हते. त्याच्या चेहऱ्यावरची रेष न रेष त्याच्यातल्या देशभक्ताचं दर्शन घडवत होती. प्रचंड श्रम केल्यावर अधिकारी व्यक्तीकडून किंवा आपल्या आदर्शाकडून कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर जी भरून पावल्याचा आनंद होतो, तो आनंद सचिनच्या चेहऱ्यावर दिसत होता. सचिन आणि देशभक्ती यांचं न तोडता येण्यासारखं नातं आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासून सचिन भारतासाठी मैदानात घाम गाळतोय. या पदाला पोहोचण्यासाठी त्याने आपलं त्याआधीचं आयुष्य खर्ची घातलंय. कोणतीही अपेक्षा न ठेवता तो मैदानावर खेळत राहतो. वैयक्तीक स्वार्थाचा विचारही करत नाही. विक्रमासाठी खेळत नाही, विक्रम होत राहतात, हा खेळत राहतो.

हेल्मेटवर भारताचा ध्वज लावून खेळणारा हा पहिला भारतीय फलंदाज. त्याच्या या प्रकारावरून वादही झाले. प्रत्यक्ष न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला. मात्र तेंडुलकर हरला नाही. त्याच्या हेल्मेटवरचा झेंडा निघाला नाही. अर्थात झेंडा लावण्यासाठी सचिन तेंडुलकरचं मस्तिष्क हीच उत्तम जागा आहे हे प्रत्येकजण मान्य करेल.
ग्रुप कॅप्टन म्हणजे एअर फोर्समधली पाचव्या क्रमांकाची ऑफिसर पोस्ट. साधारणतः २४ वर्ष सर्व्हिस झालेला ऑफिसर या पदापर्यंत पोहोचतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रुप कॅप्टन म्हणजे आर्मीतला कर्नल. सैनिकाला त्याच्या ट्रेनिंगच्या दरम्यान एक तत्व शिकवलं जातं. प्रथम माझा देश, त्यानंतर माझं युनिट, त्यानंतर माझे सहकारी आणि त्यानंतर मी या उतरत्या क्रमाने एक सैनिक आपलं काम करत राहतो. म्हणजे युद्धात प्रथम तो आपल्या देशाचं हीत पाहतो. त्यानंतर आपल्या रेजिमेंट/ युनिटचं हीत पाहतो. त्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यांचं हीत पाहतो आणि सर्वात शेवटी स्वतःचा विचार करतो. सचिनच्या आजवरच्या कारकिर्दीवर एक नजर टाका.. सचिनने याच तत्वावर आपली कारकिर्द घडवलीय हे आपल्या लक्षात येईल.
अंगावर अनेक जखमा या शूर सैनिकाने देशासाठी झेलल्या आहेत. सचिनला आत्तापर्यंत झालेल्या जखमांचा हिशेब काढा. टेनिस एल्बो, पायाचा घोटा, टाच, पाठ अशा अनेक अवयवांना दुखापत झाली आहे. तरिही प्रत्येकवेळी तो यातून बाहेर आला. या सगळ्या जखमा, दुखापती त्याला देशासाठी खेळताना झाल्या. तरिही प्रत्येकवेळी त्याच्याच खांद्यावर संघाची मदार राहिली. जबाबदारी टाकताना कोणी विचारलं नाही हा खांदा किती दुखतोय ते...
२००० साली भारतीय क्रिकेटविश्व मॅचफिक्सिंगच्या जाळ्यात अडकलं. तेव्हाही सगळ्या आशा या सचिनच्या खेळावरच होत्या. सचिन मैदानात आहे तोवर बुकींचे आणि मॅचफिक्सर्सचे घाणेरडे इरादे यशस्वी होणार नाहीत असा विश्वास क्रिकेटप्रेमी बाळगून होते. सचिनने काही प्रमाणात हा विश्वास सार्थही ठरवला.
असा हा सचिन. प्रत्येक कर्णधाराला वाटेल असा एकमेवाद्वितीय आपल्या संघात असावा. वायुदलानं ही संधी साधली. आणि त्याला आपल्या संघात सामील करून घेतला.
ब्राव्हो सचिन... तू एक निव्वळ क्रिकेटपटू नाहीस, तू एक महान सैनिक आहेस. वायुदलानं त्यावर शिक्कामोर्तब केलंय.
Thursday, July 1, 2010
शामू मावशी
आजवर मी माझ्या कोणत्याही नातेवाईकांवर काहीही लिहीले नाही. नातेवाईकांवर लिहावं असं कधी वाटलंच नाही. पण १ जुलै ललै या तारखेला स्वतःला रोखू शकलो नाही. शामू मावशी जाऊन बरोबर एक वर्ष झाले. माझे कोणतेही विधी, कर्मकांडं करू नका अशी तिची इच्छा असली तरी तिची आठवण रहावी यासाठी माझ्या परीने मी हा प्रयत्न करतोय.
शामू मावशी ही माझ्या आईची मावशी. म्हणजे नात्याने माझी आजी. पण मी कधीही तिच्याकडे आजी म्हणून पाहिलेच नाही. नात्याने ती आजी असली तरी मी तिला मावशी म्हणायचो. पण मावशी म्हणालो तरी तिच्याकडे मी मावशी म्हणूनही कधी पाहिले नाही. म्हणजे ती माझी नक्की कोण होती हा ही एक मोठा प्रश्न आहे. मी स्वतः जेव्हा विचार करतो तेव्हा मलाही हे कोडं कधीच सुटत नाही. काहीही असो ती मला खुप हवीहवीशी होती. माझ्या आईची ती मावशी असली तरी ती आईपेक्षा वयाने फार मोठी नव्हती. बऱ्याच गोष्टी शामू मावशीला सांगितल्या की आईला हलकं वाटायचं. माझ्या मते आंबयं हे आईचं आजोळ आणि शामू मावशीचं माहेरचं गाव हा दोघींचा समान धागा असावा. शामू मावशी होती हा आईला मोठा आधार होता. महिन्यातून एकदा तरी शामू मावशीला भेटायचंच हे आईने ठरवलं होतं. अर्थात या दोघींचं नातं हे मावशी भाची पेक्षा मैत्रिणींचं होतं.
मला आठवतं लहानपणी बिनधास्त रहायला जावं असं ठिकाण म्हणजे शामू मावशीचं घर. फार लहान असताना मला अंधुक आठवतंय मी विनायक काकांना फार घाबरायचो. पण नंतर मी बिनधास्त जायचो. एवढचं नाही शामू मावशीसुद्धा मला हौसेने रहायला घेऊन जायची. हा कटकट करतो, याची जेवणाची नाटकं आहेत, हा रड्या आहे अशी कोणतीही वाक्य एकट्या शामू मावशीने कधीही म्हटली नाहीत. मी ही आवडीने जायचो कारण मला माहित होतं माझी सगळी नाटकं इथे पुरवली जायची. एकटी शामू मावशी नाही तर किशोर आणि टिनूही अक्षरशः कौतुकं करायचे. टिनू, शामू मावशीची मुलगी, ही माझी मावशी, माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठी होती. त्यामुळे तिच्याशी माझं चांगलं जमायचं. टिनूने लहानपणी खुप लॉटरीची तिकीटं गोळा केली होती. त्याशिवाय सुरेशमामाकडून तिने शेअर्सचे फॉर्म, आणि तत्सम कागदपत्र जमवली होती. ती कागदपत्र घेऊन आम्ही दुपारी बँक बँक खेळायचो. आणि संध्याकाळी मंगल सोसायटीत टिनूच्या मैत्रिणींबरोबर विशांमृत किंवा लंगडी. टिनूच्या म्हणजे माझ्या मावशीच्या मैत्रिणींच्यातही मी खेळलो आहे, नाटकालाही गेलो आहे. कोजागिरीला मंगल सोसायटीत धमाल कार्यक्रम असायचा. त्यासाठी शामू मावशी मला घेऊन जायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री कितीवेळ आम्ही बॅडमिंटन खेळलो आहे याची गणतीच नाही.
मंगल सोसायटीत जाणं हा खरोखर एक आनंद होता. एकतर टिनू आणि माझं कधीही भांडण व्हायचं नाही. शामू मावशीच्या घराबरोबरच शेजारी टिकेकरांकडेही लाड व्हायचे. त्यामुळे मी नेहमीच तयार.
लहानपणी मला कोणी हुशार मुलांचे दाखले दिले की मला राग यायचा. पण टिनूचे पेपर बघणं मला फार आवडायचं. टिनू तुफान हुशार होती. प्रत्येक विषयात पैकीच्या पैकी मार्क, सुरूवातीपासून शेवटपर्यंत एकसमान अक्षरात, एकही काठ न मरता, मुद्देसूद, देखणा, काळ्या शाईपेनाने अतिषय स्वच्छ पेपर टिनू लिहायची. अजिबात अतिषयोक्ती करत नाही. पण टिनूचा पेपर तिच्या वर्गात आदर्श पेपर म्हणून दाखवला जायचा. त्याशिवाय टिनूची चित्रकला. विविध रंगांच्या शेड्स ती उत्तम तयार करायची. मंगल सोसायटीत बाहेरच्या खोलीत असलेल्या कपाटावर टिनूच्या चित्रांच्या गठ्ठा होता. तो बघणं हे माझं आवडतं काम.. आणि खरं सांगतो, हुशार मुलांच्या आया जसं वागतात तसं शामू मावशी एकदाही वागली नाही.
शामू मावशी स्वतः खरोखर निटनेटकी होती. तिची तब्येत नाजूक होती. त्यामुळे दुपारी किती जेवायचं, कोणत्या भाज्या खायच्या, त्या कशा करायच्या याचं सगळं प्रमाण ठरलेलं होतं. एवढच कशाला किती बोलाय़चं, आवाज केवढा ठेवायचा हे देखील तिने ठरवून घेतलं असावं. जेवण झाल्यावर दुपारी भाजलेली, हळद लावलेली बडिशोब आणि त्यानंतर पत्ते खेळायला तिला आवडायचं.
शामू मावशी खुप कणखर होती हे आज विचार केल्यावर मला जाणवतं. विनायक काका गेल्यावर मुलांना मोठं करणं त्यांचे संसार उभे करणं हे तीने फार कसोशीने केलं. मला आठवतं विनायक काका गेले त्यावेळी ती डोंबिवली फिवरसारख्या भयानक आजारातून उठली होती. त्यानंतरही काही वर्षांनी तिला आतड्यांचा त्रास जाणवू लागला होता. टिनू त्यावेळी कॉलेजमध्ये होती. त्यावेळी माझ्या आईने मला सांगितलं होतं की तिच्या आतड्याचा काही भाग काढला होता. हे तिच्या जिवावरंच दुखणं होतं. त्यावेळीही तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तिने या दुखण्यातून मार्ग काढला. माझी आई म्हणते ती खुप धीराची होती. तिची इच्छाशक्ती प्रबळ होती.
सातवीत असताना माझा क्लास टिळकनगर शाळेच्या जवळ पाध्येबाईंच्या घरी दुपारी असायचा. एमआयडीसीत घरी येऊन पुन्हा क्लासला येणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी सातवी आणि आठवीत असताना रोज शाळा सुटल्यावर दोन तास शामू मावशीकडे जायचो. खरोखर हक्काने जायचो.
कॉलेजला जायला लागल्यावर मात्र मी तिथे फारसा जाईनासा झालो. महिन्यात एखादीच चक्कर टाकायचो. कारण मलाही माहित नाही. खरोखर वेळ नसावा, मला शिंगं फुटली असावीत किंवा इतर काहीही असो. पण आठवण मात्र यायची.
आज शामू मावशी नाही. तिला जाऊन तब्बल एक वर्ष झालं. तिची आठवण मात्र येते. टिनू दुबईला असली, शामू मावशी तिथे नसली तरी त्या घराची ओढ अजूनही आहे. चारू(मामी) अजिबात या दोघींची उणीव जाणवू देत नाही. तरीही तिथे शामू मावशी नाही ही जाणीव अस्वस्थ करते. नात्याने माझी आजी, म्हणायचो मावशी, तरीही ती माझी नक्की कोण होती या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आजही नाही.

Saturday, June 19, 2010
पावसाची कविता
बाहेर सुंदर पाऊस पडतोय. अशावेळी पावसावर काहीतरी लिहावं असं वाटतं होतं. मात्र मला सुचत नव्हतं. पण एकेदिवशी माझ्या बायकोने मला एक मस्त बातमी सांगितली. माझ्या मेव्हण्याने पावसातून प्रेरणा घेत एक झकास पहिली वहिली रोमँटीक कविता लिहीली आहे. कविता वाचल्यावर मला आवडली. परागला लगेच विचारलं त्याची काही हरकत नसेल तर या कवितेला मी माझ्या ब्लॉगवर अपलोड करायला उत्सुक आहे. त्याने परवानगी दिलीय. तेव्हा आता माझा मेव्हणा पराग राजवाडे यांनी केलेली ही कविता वाचा...

चिंब भिजलेल्या अंगावर पडणारा पाऊस, आणि वाहणारा धुंद वारा,
तुझ्या माझा प्रेमाचा अर्थ, उलगडून सांगे सारा
तुझ्या सौंदर्यामुळे विचार थक्क होऊन जातात
हातात छत्री नसताना, तुला छत्रीत घेऊ पाहतात.
नजरेला चुकून मिळालेली नजर, झटक्यात काम करून जाते
मनात उत्कंठा निर्माण करून, भावनांच्या जाळ्यात अडकू पहाते
भावनांच्या अटीतटीच्या खेळात पाऊस थांबतो, पण मन थांबत नाही
बसता उठता खाता पिता सतत, तुझ्याच सावलीचा पाठलाग करत राही
थेंब पाण्याचे हळूहळू खाली सरताना, जणू अंधारात कुठेतरी वाट शोधत राहतात
हळूच ओठांमध्ये गुडूप होताना, शहारलेल्या तनाची मजा आवडीने पाहतात
पावसात भिजल्यावर.. सखे तू वाटावीस अशी, वृक्षावर नवी पालवी अशी
एकीकडे वादळातही तग धरून राहणारी झाडे असताना, छोट्याशा स्पर्शाने शहारलेली लाजाळू जशी
अखेरीस एकच प्रश्न मनात येतो, मनात हे काव्य रचताना
की देवाने मनात प्रेम का द्यावे, कोणालाही त्याचा अर्थ कळत नसताना
- पराग राजवाडे

('जाणीव' या ब्लॉग स्पॉटवर आपली कविता अपलोड करायला परवानगी दिल्याबद्दल पराग राजवाडे यांना धन्यवाद)

Tuesday, June 15, 2010
माती मधूनी दरवळणारे ते गाव माझे- भाग दोन
डोंबिवली हे माझे शहर. खरं म्हणजे काही वर्षांपूर्वी या शहरात असलेल्या उघड्या गटारांमुळे आणि डासांमुळे आजही हे शहर हेटाळणीचा विषय आहे. उघडी गटारं आणि डास आणि त्यामुळे निर्माण होणारी रोगराई हा डोंबिवलीत तरी इतिहास झालाय. इतर शहरांचं आम्हाला माहित नाही. तर डोंबिवली हे खरोखर सुंदर शहर आहे असं प्रत्येक मूळ डोंबिवलीकराला वाटतं. पण नुसतं वाटून उपयोग नाही. त्यामुळे आपल्या जाणीव या ब्लॉगच्या माध्यमातून डोंबिवली शहरातली सौंदर्यस्थळ दाखवण्याचा प्रयत्न मी सुरू केला. त्याला माती मधूनी दरवळणारे ते गाव माझे असं नाव मला सुचलंय. गेल्यावेळी आपण डोंबिवलीतली फडके रोडवरची दिवाळी पहाट पाहिली होती. आता आपण फेरफटका मारूया डोंबिवलीतल्या भोपर या गावातल्या टेकडीवर.. साधारणतः प्रत्येक डोंबिवलीकराला भोपर हे गाव ऐकून माहित आहे. मात्र तिथे असलेल्या छोट्याशा टेकडीवर एखादी संध्याकाळ फार प्रसन्न वातावरणात घालवू शकता याची माहिती मात्र अनेकांना नसेल.
भोपरची टेकडी ओळखली जाते ती अनेक वर्षांपासून असलेल्या गावदेवीच्या मंदिरामुळे. कोपर स्टेशनमध्ये गाडी शिरायच्या आधी ही टेकडी दूरवर पाहू शकाल. अर्थात भोपर हे गाव डोंबिवलीत अनेकांना माहित असलं तरी प्रत्यक्ष त्या गावात जाण्याचं धाडस अनेक जुन्या आणि जाणत्या डोंबिवलीकरांनी कधी केलं नसेल. अगदी नांदीवलीपर्यंतच्या भागाचा विकास जोमाने झाला. पण भोपर हे नेहमीच गाव राहीलं. मात्र भोपर जवळ श्री गणेश मंदिर निर्माण झालं आणि डोंबिवलीकरांचा या ठिकाणी राबता सुरू झाला. मग गणेश मंदिराबरोबर गावदेवीचं दर्शन घ्यायलाही गर्दी वाढायला लागली. भोपरच्या या गावदेवी मैदानाच्या बाजूलाच थोडासा मोकळा पठारी भाग आहे. त्या पठारावर उभं राहिलं की दूरवर पारसिक ते हाजीमलंग अशी पसरलेली डोंगररांग मोहक दिसते.
तिथून दिसणाऱ्या या सृष्टी सौदर्यांवर मोहीत होऊन आणि स्वच्छ हवा खाण्यासाठी डोंबिवलीतून लोक इथे यायला लागले. त्यातच भोपरच्या ग्रामपंचायतीनेही फिरायला आलेल्या पाहुण्यांसाठी या पठारावर सुशोभिकरणातून सुंदर बेंचेस बांधले. दिव्यांची व्यवस्था केली आहे. ज्याला बसायला बेंचेस मिळणार नाहीत त्यांच्यासाठी जमिनीवर सिमेंटचे चौथरे बांधले आहेत. त्यामुळे अगदी पाय मोकळे पसरून आरामात बसा.. भेळ खा.. सुंदर सोय आहे.
या पठारावर तुम्ही उभे राहिलात की पश्चिमेला मुंब्रा देवीचा डोंगर दिसेल. तर पुर्वेला हाजी मलंग डोंगररांग दिसेल. उत्तरेला डोंबिवली शहराचा विस्तार दिसेल. तर दक्षिणेला मोठ्या माळा पलिकडे मुंब्रा कौसा हा विभाग दिसेल. या टेकडीच्या भोवताली मोठा माळ असल्यामुळे आणि खाडी जवळ असल्यामुळे संध्याकाळी पश्चिमेचा थंड वारा मोहून टाकतो.
या ठिकाणी तुमची एखादी संध्याकाळ झकास जाऊ शकते. मोकळी हवा खात गप्पांचा झकास अड्डा जमू शकतो. भोपर ग्रामपंचायतीने या भागाची खरोखर काळजी घेतली आहे.
टेकडी वरच्या पठारापर्यंत गाडी वर पर्यंत यावी यासाठी त्यांनी सिमेंटचा रस्ताही बांधलाय. अर्थात अशा ठिकाणी लव्हर्स स्पॉट निर्माण होण्याची भिती असते. तसंच अशा ठिकाणी बाटल्या उघडणाऱ्यांचाही त्रास होऊ शकतो. पण घाबरू नका. याची काळजीही ग्रामपंचायतीने घेतली आहे. या भागात मद्यपींना प्रतिबंध करण्यात आला आहे.
तसंच या टेकडीच्या पायथ्याशी भोपर ग्रामपंचायतीने एक खतरनाक संदेश लिहिला आहे. प्रेमी युगुलांनी हा संदेश आधी वाचा आणि मगच या टेकडीची पायरी चढा. नियम हे मोडण्यासाठी असतात वगैरे वाक्य तुम्ही किमान भोपर गावात तरी उच्चारण्याची हिंमत करू नका.. त्यामुळे स्वच्छंदी, मोकळ्या वातावरणात एखादी संध्याकाळी आनंददायी करण्यासाठी भोपर टेकडीला नक्कीच भेट द्या.. मजा येईल.
भोपरची टेकडी ओळखली जाते ती अनेक वर्षांपासून असलेल्या गावदेवीच्या मंदिरामुळे. कोपर स्टेशनमध्ये गाडी शिरायच्या आधी ही टेकडी दूरवर पाहू शकाल. अर्थात भोपर हे गाव डोंबिवलीत अनेकांना माहित असलं तरी प्रत्यक्ष त्या गावात जाण्याचं धाडस अनेक जुन्या आणि जाणत्या डोंबिवलीकरांनी कधी केलं नसेल. अगदी नांदीवलीपर्यंतच्या भागाचा विकास जोमाने झाला. पण भोपर हे नेहमीच गाव राहीलं. मात्र भोपर जवळ श्री गणेश मंदिर निर्माण झालं आणि डोंबिवलीकरांचा या ठिकाणी राबता सुरू झाला. मग गणेश मंदिराबरोबर गावदेवीचं दर्शन घ्यायलाही गर्दी वाढायला लागली. भोपरच्या या गावदेवी मैदानाच्या बाजूलाच थोडासा मोकळा पठारी भाग आहे. त्या पठारावर उभं राहिलं की दूरवर पारसिक ते हाजीमलंग अशी पसरलेली डोंगररांग मोहक दिसते.
तिथून दिसणाऱ्या या सृष्टी सौदर्यांवर मोहीत होऊन आणि स्वच्छ हवा खाण्यासाठी डोंबिवलीतून लोक इथे यायला लागले. त्यातच भोपरच्या ग्रामपंचायतीनेही फिरायला आलेल्या पाहुण्यांसाठी या पठारावर सुशोभिकरणातून सुंदर बेंचेस बांधले. दिव्यांची व्यवस्था केली आहे. ज्याला बसायला बेंचेस मिळणार नाहीत त्यांच्यासाठी जमिनीवर सिमेंटचे चौथरे बांधले आहेत. त्यामुळे अगदी पाय मोकळे पसरून आरामात बसा.. भेळ खा.. सुंदर सोय आहे.
या पठारावर तुम्ही उभे राहिलात की पश्चिमेला मुंब्रा देवीचा डोंगर दिसेल. तर पुर्वेला हाजी मलंग डोंगररांग दिसेल. उत्तरेला डोंबिवली शहराचा विस्तार दिसेल. तर दक्षिणेला मोठ्या माळा पलिकडे मुंब्रा कौसा हा विभाग दिसेल. या टेकडीच्या भोवताली मोठा माळ असल्यामुळे आणि खाडी जवळ असल्यामुळे संध्याकाळी पश्चिमेचा थंड वारा मोहून टाकतो. या ठिकाणी तुमची एखादी संध्याकाळ झकास जाऊ शकते. मोकळी हवा खात गप्पांचा झकास अड्डा जमू शकतो. भोपर ग्रामपंचायतीने या भागाची खरोखर काळजी घेतली आहे.
टेकडी वरच्या पठारापर्यंत गाडी वर पर्यंत यावी यासाठी त्यांनी सिमेंटचा रस्ताही बांधलाय. अर्थात अशा ठिकाणी लव्हर्स स्पॉट निर्माण होण्याची भिती असते. तसंच अशा ठिकाणी बाटल्या उघडणाऱ्यांचाही त्रास होऊ शकतो. पण घाबरू नका. याची काळजीही ग्रामपंचायतीने घेतली आहे. या भागात मद्यपींना प्रतिबंध करण्यात आला आहे.
तसंच या टेकडीच्या पायथ्याशी भोपर ग्रामपंचायतीने एक खतरनाक संदेश लिहिला आहे. प्रेमी युगुलांनी हा संदेश आधी वाचा आणि मगच या टेकडीची पायरी चढा. नियम हे मोडण्यासाठी असतात वगैरे वाक्य तुम्ही किमान भोपर गावात तरी उच्चारण्याची हिंमत करू नका.. त्यामुळे स्वच्छंदी, मोकळ्या वातावरणात एखादी संध्याकाळी आनंददायी करण्यासाठी भोपर टेकडीला नक्कीच भेट द्या.. मजा येईल.
Subscribe to:
Posts (Atom)