Thursday, March 3, 2011

पोटासाठी वाटेल ते..

टीचभर खळगीसाठी माणसाला काय काय करावं लागतं याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मायानगरी मुंबईत नशिब काढायला आलेल्यांनी तर काय काय धंदे केलेत, काय काय पचवलंय याचे तर अगणित किस्से आहेत. त्यात आता आणखी एक किस्सा.. या फोटोतली ही मॉडेल आहे सोफिया हयात..

मुळची पाकिस्तानी मॉडेल. मुंबईत आपलं करियर घडवण्यासाठी ती आलीये. तशी ती ब्रिटीश नागरिक, पण जन्माने पाकिस्तानी. ही मॉ़डेल, टीव्ही एँकर, एँक्ट्रेस आता बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. बॉलिवूडचा तुफान पैसा तिला खुणावतोय. पण 'इये बॉलिवूडचीये नगरी' बस्तान बसवायचं म्हणजे फार कठीण काम आहे. अनेकजणी आल्या आणि गेल्या. या बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अनेकांच्या रांगा लागल्यात. त्यांना स्ट्ररगलर्स असं गोंडस नाव देण्यात आलं. त्या स्ट्रगलर्सच्या यादीत आता सोफियाचंही नाव सामील झालंय. तर सांगायचा मुद्दा असा की आता सोफियाचा हा फोटो पहा.. या फोटोत ती भारताला प्रमोट करत आहे.

भारताला प्रमोट का.. तर आता तिचा पहिलावहिला भारतीय सिनेमा म्हणजेच बॉलिवूड चित्रपट येतोय. त्याचं नाव आहे 'डायरी ऑफ ए बटरफ्लाय'.. हा चित्रपट फारसा कोणी ऐकलेला नाही. पण सोफियाची बॉलीवूडमध्ये जम बसवण्याची इच्छा आहे. त्यासाठी ही पाकिस्तानी मुलगी भारताची झेंडा गालावर कोरून, स्वतःच्या उघड्या पाठीवर किंवा कंबरेवर भारताला शुभेच्छा गोंदवून, भारताला चिअर करत्ये..वा.. पोटासाठी काय काय करावं लागतं.. एक पाकिस्तानी मुलगी अशा भारताला शुभेच्छा देत आहे. एकीकडे पाकिस्तान आपल्या कलाकारांना व्हीसा नामंजूर करतोय. राहत फतेह अली खानच्या प्रकरणानंतर पाकिस्ताननं भारतात जाणाऱ्या कलाकारांना नाहरकत प्रमाणपत्र घेण्याचं बंधन घातलंय.

पण एवढं सगळं झालं तरी सोफिया भारताला चिअर करत्ये. क्या बात है.. पोट काय काय करायला लावतं..

3 comments:

  1. hey amit,sunder lihilay..mazya mate patrakarite madhe aalyavar padya magchya goshti ani aayushyatali katu satya distat...ti nemkya shabda madhe tiplis rao!!!sunder...pan he chavat photo ati lavale...tyamule content varun laksh udnyachi bhiti ahe!!

    ReplyDelete
  2. व्वा. अमित. मस्तच. पण यात नवीन काही नाही. अनेक पाकिस्तानी कलाकार पोटासाठी भारताकडेच बघतायत. त्यांच्या इथं फिल्म इंडस्ट्री कुठाय? वीणा मलिक एका चॅनलवर क्रिकेट एक्सपर्ट आहे. तिनं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, की माझा पाठिंबा पाकिस्तानी संघाला आहे, पण भारताचा संघही माझा आवडता आहे... आता बोल!

    ReplyDelete
  3. खरं आहे. पोटासाठी सगळ्यांनाच काही ना करावं लागतं. इच्छा असो वा नसो, काही गोष्टी एक्सपोज कराव्या लागतात. Carlton fisk चे एक छान वाक्य आहे. "It's not what u achieve, it what u overcome. That's what defines your career."

    ReplyDelete